​सावंतवाडी : कशाळीकर उद्योग समूहातर्फे गुणवंत विद्यार्थी व दीर्घसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ जून

हॉटेल रुची डिलक्स व कशाळीकर उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या यशस्वी मुला-मुलींचे अभिनंदन आणि कर्मचाऱ्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम नुकताच हॉटेल रुची डिलक्समध्ये पार पडला.
​यावेळी गोव्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ. मीना समुद्र, अर्चना व्यास, हॉटेल कर्मचारी व मित्र मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तसेच कशाळीकर उद्योग समूहात गेली ३५ व २० वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आणि आत्मियतेने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही पुष्पगुच्छ व आर्थिक मदत देऊन विशेष गौरव करण्यात आला
​या कार्यक्रमात भक्ती कशाळीकर (पी.एचडी.) व आद्या कशाळीकर (डॉक्टर) या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुकुंद डुगल, अर्जुन राऊळ, जगदीश डुगल, सदानंद जोशी, सुप्रिया राऊळ, ललिता ताती, भानुदास नार्वेकर आणि सुप्रिया खांडाळेकर या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

शेअर करा