सावंतवाडी,दि.११ सप्टेंबर
‘कोकण मराठी साहित्य परिषद चे विशेष गीत साठी खास गीत रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले आहे. कोकणातील नवोदित व ज्येष्ठ साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. परिषदेच्या प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिमानाने आणि सामूहिक स्वरात गायले जाईल अशा गीताची निवड करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक लेखक कवी आदीने येत्या 20 सप्टेंबर पर्यंत कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळ कडे लेखी स्वरूपात सुवाच्च हस्ताक्षरात चार ते पाच ओळीत गीत लिहून पाठवावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले आहे
या गीताद्वारे कोमसापची ओळख, मराठी साहित्याचा गौरव आणि कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधोरेखित केली जाणार आहे. गीत रचनेसाठी महत्त्वाच्या अटी व निकषात गीत एकूण १२ ओळींचे असावे. (प्रत्येक कडव्यात ३ ओळी याप्रमाणे एकूण ४ कडवी), रचनेत कोमसापची वाटचाल व ध्येय, मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव, कोकणची निसर्गसमृद्धी (समुद्र, डोंगर, माती), साहित्यिक परंपरा, ज्ञान-सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समावेश असावा. तसेच रचना प्रेरणादायी, भावपूर्ण, ओजस्वी आणि सहज समूहगायन करता येईल अशी असावी. शब्द साधे पण साहित्यिक दर्जाचे असावेत. ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडणार आहेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी कणकवली मालवण या तालुका शाखा स्तरावर. हे गीत लिखित स्वरूपात व मोबाईलवर पुणे ठिकाणी पाठवाव्यात तसेच तालुकास्तरावर 15 सप्टेंबर पर्यंत पाठवण्यात याव्यात व जिल्हा स्तरावर तालुका शाखा अध्यक्ष यांनी 20 सप्टेंबर पर्यंत स्तरावर, पाठवण्यात याव्यात त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय आलेल्या गीतांचे एकत्रीकरण करून ते. अंतिम फेरीत कोकणातील साताही जिल्ह्यांमधून निवडलेल्या सर्वोत्तम रचनांमधून परीक्षक मंडळाद्वारे एका उत्कृष्ट गीताची अधिकृत ‘कोमसाप गीत’ म्हणून निवड केली जाईल. निवड झालेल्या विजेत्या गीतकाराचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सन्मान व गौरव करण्यात येणार आहे. ही स्पर्धा कोमसाप आजीव सदस्यांसाठी मर्यादित असल्यानेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोमसापच्या सर्व आजीव सभासदांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेआवाहन करण्यात आले आहे केले आहे. स्पर्धेसाठीचे गीत पाठवण्यासाठी व्हाट्सअप असेच लेखी स्वरूपात सर्व तालुका शाखा ने व ज्यांना जिल्हास्तरावर पाठवायचे आहेत त्यांनी जिल्हास्तरावर 20 सप्टेंबर पर्यंत पाठवावे .9890107352.व9423051530या नंबर वर पाठवावेत असे.जिल्हा सचिव. ॲड संतोष सावंत यांनी केले आहे