​​सावंतवाडी : बांदा येथे १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ कार्यक्रमाचे आयोजन; जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२३ जून
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक १ जुलै रोजी बांदा येथे ‘कृषिदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
​पंचायत समिती सावंतवाडी, कृषि विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीम. सुस्मिता जाधव या असणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती श्री. गौरव मुळीक उपस्थित राहणार आहेत.
​या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीम. शिवानी नाईक,श्रीम. शोभा गावडे, श्री. मायकल फ्रान्सिस डिसोजा, श्री. संदीप गावडे,श्री. विक्रांत विकास सावंत, श्री. नितीन राऊळ, श्रीम. अपर्णा सातोस्कर, श्री. सुदन कवठणकर तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
​या कृषिदिन कार्यक्रमाला नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक श्रीम. प्रियांका नाईक (सरपंच, बांदा), श्री. रत्नाकर आगलावे (उपसरपंच, बांदा), श्री. गोरखनाथ गोरे (तालुका कृषि अधिकारी, सावंतवाडी), श्री. निलेश जाधव (गटविकास अधिकारी, सावंतवाडी) व श्रीम. शारदा नाडेकर (कृषि अधिकारी, सावंतवाडी) यांनी केले आहे.

शेअर करा