सावंतवाडी,दि. १८ ऑगस्ट
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीच्या वतीने मोफत दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने प्रसिद्ध ‘सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग’ यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता ‘गोविंद चित्र मंदिर’, सावंतवाडी येथे रंगणार आहे.
दशावतार कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांनी आणि नाट्यप्रेमी मंडळींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा, असे जाहीर आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष श्री. रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.