सावंतवाडी,दि.२६ सप्टेंबर
बांदा येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत (५५ ते ५९ किलो वजनी गट) त्याने प्रथम क्रमांक पटकावला. या यशानंतर ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
त्याच्या या यशाबद्दल शाळेत त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तुझ्या यशाने आमच्या शाळेचा अभिमान वाढला आहे, अशी भावना शाळेच्या सी ई ओ मैथिली नाईक, यांनी व्यक्त केली
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि ग्रामस्थानी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.