सावंतवाडी दि.२८ सप्टेंबर
पुस्तकं ही माहितीचा स्त्रोत असून सद्यस्थितीत वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत होणे गरजेचे आहे आणि याच उद्देशातून पुस्तकांविषयी बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी भूमिका विनय सौदागर यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडली. निमित्त होते साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या एकाहत्तराव्या मासिक साहित्य कार्यक्रमाचे.
शिरोडा येथील र.ग. खटखटे ग्रंथालयात रंगलेल्या ‘पुस्तकाविषयी बोलू काही’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कट्ट्याचे समन्वयक सौदागर यांनी केले त्यानंतर नऊ वाचक त्यांना भावलेल्या पुस्तकाविषयी बोलले.
सर्वप्रथम तन्वी ओटवणेकर यांनी राजू बाविस्कर लिखित काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाविषयीची पाठवलेली ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली. नंतर पंधरा कायद्याविषयी माहिती देणाऱ्या ॲड. दीपक नेवगी लिखित ‘येस यूवर ऑनर’ या पुस्तकावर ॲड.श्रद्धा राऊळ बोलल्या. नंतर विभुतीभूषण बॅनर्जी लिखित रस्त्याचे गाणे गाणार्या ‘पथेर पांचाली’ या अनुवादित पुस्तकाविषयी अरुण धर्णे बोलले. विनय सौदागर यांच्या ‘भोवताल’ या काव्यसंग्रहाविषयी स्नेहा नारिंगणेकर यांनी विवेचन केले. डाॅ. ऐश्वर्य रेवडकर यांच्या ‘बिजापूर डायरी’ पुस्तकावर नीलम कांबळे, वि.स. खांडेकर लिखित ‘ढगा आडचे चांदणे’ पुस्तकाविषयी सरोज रेडकर, वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ विषयी नम्रता राय, सकल संत चरित्र गाथेवर डाॅ.श्रीराम दीक्षित आणि मुक्तक जोशी यांच्या ‘ शेती नवीन चष्म्यातून’ या पुस्तकावर विनय सौदागर यांनी विवेचन केले. शेवटी सचिन गावडे यांनी आभार मानले.
सुमारे दीड तास रंगलेल्या या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला. भालचंद्र दीक्षित, मेधा दीक्षित, विनायक उमर्ये, रामचंद्र बेहेरे, प्राची पालयेकर, एकनाथ शेटकर, सोमा गावडे,अविनाश जोशी, जयदीप देशपांडे, विशाल उगवेकर, अनिता सौदागर, संदीप गोडकर, प्रकाश मिशाळ, उदय पार्सेकर, भाग्यश्री मुद्रस लिना परब, अर्चना लोखंडे, जनार्दन पडवळ आणि पत्रकार अनिल निखार्गे यासह अनेक साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली..