सावंतवाडी : महाकवी कालिदास दिन उत्साह

शेअर करा

सावंतवाडी,दि.१८ जुलै

भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये जिज्ञासा संस्कृत क्लब एवं संस्कृत संहिता सिध्दांत विभागाच्यावतीने महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व महाकवी कालिदास यांच्या पूजनाने झाली. प्रथम वर्ष बी.ए.एम. एस. (आयुर्वेदाचार्य) च्या विद्यार्थीनी आर्या पाटील,प्रज्ञा पोळ,निकिता मिश्रा, अनार्या यांनी कविकुलगुरु कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान सविस्तरपणे कथन केले. तसेच त्यांच्या साहित्यिक योगदानावर भाषणे सादर करून संस्कृत भाषेचे संवर्धन व भारतीय ज्ञानपरंपरेतील तिचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी संहिता विभाग प्रमुख प्रा. वैदय बी.डी. पाटील यांनी आयुर्वेद शिक्षणामध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट करत संस्कृत ही आयुर्वेद अध्ययनाची मूलभूत भाषा असून प्रत्येक आयुर्वेद विद्यार्थ्यासाठी तिचे ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले. संस्कृत संधि प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले. प्रथम वर्ष बी एम एस मध्ये विद्यार्थ्यांची दहा गटात विभागणी करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या वातावरणात स्पर्धा संपन्न झाली. विजेत्यांचा प्रा वैद्य राजेशकुमार सवई. ( शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमास प्रा.वैद्या मुग्धा ठाकरे, प्रा.वैद्या भारती घाडगे उपस्थित होत्या. प्रा.वैद्या शीतल पाटील (सचिव जिज्ञासा संस्कृत क्लब) यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

शेअर करा