​​सावंतवाडी : लोकनेते ना. भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव समाधीस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली व अभिवादन

शेअर करा

​सावंतवाडी, दि.२६ जून


लोकनेते ना. भाईसाहेब सावंत यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथील त्यांच्या समाधीस्थळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली व अभिवादन अर्पण केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विक्रांतभाई सावंत, पंचायत समिती सदस्य श्री. जितेंद्र गावकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सदस्य श्री. सतिश बागवे, संचालक श्री. संदिप राणे आणि सदस्या श्रीम. वसुधा मुळीक प्रामुख्याने उपस्थित होते.
​या अभिवादन सभेला माजी मुख्याध्यापक श्रीम. सोनाली सावंत, श्री. के. टी. परब, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. जगदीश धोंड, श्री. बोडके, श्री. शैलेश नाईक, श्री. पी. एम. सावंत, श्री. धिरेंद्र जाधव होळीकर, अॅड. शामराव सावंत, श्री. एन. ए. देवरकर, श्री. रविंद्र म्हापसेकर, श्री. संजय कानसे, श्री. प्रसाद सावंत, श्री. आबा सावंत आणि श्री. अण्णा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
​याप्रसंगी आरपीडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. सुमेधा नाईक धुरी, पर्यवेक्षक श्री. नामदेव मुठे, प्रभारी उपप्राचार्य श्रीम. ईश्वरी कांबळे, तसेच दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. एम. पाटील, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माजगाव येथे भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली.
​यासोबतच आरपीडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दोडामार्ग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि चौकुळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही आपापल्या विद्यालयात श्रद्धांजली अर्पण केली.

शेअर करा