पांढरी काठी दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सिंधुदुर्गतर्फे NAB नेत्र रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन!
सावंतवाडी,दि.१३ ऑक्टोंबर
१५ ऑक्टोबर पांढरी काठी दिन निमित्य नॅशनल असोसिएशन फॉर डी ब्लाइंड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी,यांचे तर्फे दृष्टीबाधित लाभार्थ्यान साठी स्नेह मेळावा, Nab नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी येथील पहिल्या मजल्यावर आयोजित केला आहे.या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील राऊळ साहेब,अध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा पत संस्था फेडरेशन व सैनिक पत संस्थेचे प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रो प्रणय तेलीसाहेब कुडाळ हे उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व दृष्टी बाधित लाभार्थ्यांनी उपस्थित रहावयाचे आहे.हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आहे.या वेळी आवश्यक असणाऱ्यांना पांढरी काठी देण्यात येणार आहे.या वेळी चहा पाणी व भोजन देण्यात येणार आहे.तरी सर्व दृष्टी बाधित व सर्व रोटरी, इनरव्हील, लायन बंधू भगिनी व हितचिंतक यांनी उपस्थित असे nab सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री अनंत व्यंकटेश उचगावकर व सचिव श्री सोमनाथ जिनी यांनी आवाहन केले आहे.