सावंतवाडी : मडूरे-परबवाडी येथे आमदार दीपक केसरकरांनी घेतले गणरायाचे दर्शन

शेअर करा

संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा; सर्वधर्मीयांच्या सुख-समृद्धीसाठी मागितले आशीर्वाद

सावंतवाडी,दि.२१ सप्टेंबर
शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी नुकतेच दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करून सर्वधर्मीयांच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले.
​या प्रसंगी मडूरे गावचे सरपंच उदय चिंदरकर, आबा केसरकर, वामन नार्वेकर, संतोष नार्वेकर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, परब कुटुंबीय आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात आमदार केसरकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी वेळात वेळ काढून कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन गणरायाचे दर्शन घेण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. आमदारांच्या या थेट भेटीगाठींमुळे आणि आपुलकीच्या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन चेतना व ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा