सावंतवाडी,दि.१० ऑगस्ट
सावंतवाडी शहरातील काजरकोंड येथे दुपारी सव्वा एकच्या सुमारास चालत्या दुचाकीला अचानक आग लागून गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेखर सुभेदार यांनी आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. तर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.