सावंतवाडीत मुजिब शेख मित्रमंडळाची भव्य ‘एकता दहीहंडी’

शेअर करा

एक लाखांची दहीहंडी आडीवरे गोविंदा मंडळाने फोडली; रिलस्टार संजना रावले ठरली आकर्षण

सावंतवाडी,दि.०६ सप्टेंबर

मुजिब शेख मित्रमंडळ सावंतवाडीकडून भव्य ‘एकता दहीहंडी’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १ लाखांची दहीहंडी यावेळी उभारण्यात आली होती. या बक्षीसाचे मानकरी आडीवरे गोविंदा मंडळ ठरले. तर रिलस्टार कर्ली मेस संजना रावले हीची उपस्थिती कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली.

दरम्यान, अमेय तेंडोलकर मित्रमंडळाला दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला. राजापूर येथील महिला गोविंदा पथक देखील यावेळी उपस्थित होते. तर एम.जे. डान्स ॲकॅडमीचे नृत्याविष्कार, सिंगींग आणि इतर करमणुकीचे कार्यक्रम सूत्रसंचालक शुभम धुरीच्या उपस्थितीत पार पडले. तसेच खास आकर्षण सेल्फी पॉईंट ठरला. साकारलेल्या देखाव्यातून प्राणी वाचवा, निसर्ग जपा हा सामाजिक संदेश देणारा देण्यात आला. यावेळी मुजीब शेख, प्रवीण गावडे, अण्णा म्हापसेकर, प्रभाकर गुरव, हिदायतुल्ला खान, अमोल शितोळे, जाफर खानापूरी, मार्टिन आल्मेडा आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा