सावंतवाडी नगराध्यक्ष चषक बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

शेअर करा

आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण

सावंतवाडी, दि. ०८ जुलै

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित नगराध्यक्ष चषक 2026 जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धत एस सी स्पोर्ट्स अकॅडेमीच्या मुलाची दमदार कामगिरी.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. खेळाडूंनी चुरशीचे सामने खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, “अशा क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळते. नगरपरिषदेचे हे उपक्रम कौतुकास्पद आहेत.”

यामध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी, सावंतवाडी च्या मुलांची विशेष लक्ष वेधले.
शालेय मुलांच्या १३ व १८ वर्षाखालील मुले व मुली गटात
८ पैकी ६ विजेते व उपविजेते हे एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी चे प्रशिक्षक श्री.सुमुख चव्हाण यांच्याकडे प्रशिक्षक घेत आहेत.

नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा