सावंतवाडी टर्मिनस सह मळगाव,न्हावेली व निरवडे गावांसाठी नाबार्ड मधुन पाणी पुरवठा योजना

शेअर करा

सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.
​यावेळी बोलताना आमदार केसरकर यांनी सांगितले की, विधानसभा मतदारसंघातील पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इन्सुली ते आडाळी एमआयडीसीपर्यंत महत्त्वाची वीज वाहिनी टाकून दोडामार्ग तालुका व आडाळी एमआयडीसी भागातील वीज वितरण व्यवस्था बळकट केली जात आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये ४९ नवे उद्योग येणार असल्याने वीज वितरण कंपनीकडून वाहिन्या टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. या कामात कोणतीही अडचण किंवा विरोध आल्यास संबंधितांशी संवाद साधून तो सोडवला जाईल; मात्र गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेअर करा