मालवण,दि.२६ जून
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या गणित प्रज्ञा शोध परीक्षेत मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थी नागेंद्र युवराज तारी याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नागेंद्रने सिल्व्हर कॅटेगरी प्राप्त करत परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्र मिळविले आहे.
या यशासाठी नागेंद्रला शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. अस्मिता वाईरकर श्रीमती पूनम मेस्त्री, श्री कोचरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नागेंद्रच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, माजी मुख्याध्यापक एच. बी. तिवले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.