​सावंतवाडी : ​मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत शनिवारी सावंतवाडीत राष्ट्रीय पक्षांची बैठक; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ जून
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्यासाठी २७० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी तालुक्यातील सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष, बूथ लेव्हल एजंट (BLA), लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्‍यांची एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक उद्या शनिवार, दिनांक २७ जून रोजी सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.
​या बैठकीला सावंतवाडी तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.
​याशिवाय, तालुक्यातील मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने सावंतवाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती व उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य, तालुक्यातील सर्व सरपंच आणि राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले सर्व मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (BLA) यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​मतदार यादी पुनरीक्षणाचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व संबंधित पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ‘बीएलए’ यांनी शनिवार दिनांक २७ जून रोजी सकाळी १०:३० वाजता वेळेवर व स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

शेअर करा