सावंतवाडी,दि.९ जून
मृग नक्षत्र सुरू आहे. मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. या सृजनाच्या उत्सवाचे औचित्य साधून शिरोडा येथे ‘निसर्गाच्या शब्दसान्निध्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग मासिक अडुसष्ठाव्या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात निसर्ग विषयक कविता, कथा, ललितलेख, नाट्य आदी साहित्यप्रकाराचे सादरीकरण करण्यात येईल.
निसर्गाच्या शब्दसान्निध्यात नावाने सादर होणारा हा कार्यक्रम शनिवार दि. १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी केले आहे.