Sawantwadi : मैदानी क्रीडा स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे घवघवीत यश

शेअर करा

तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, आर्या कापडी व प्राची राऊळ यांची विशेष कामगिरी

सावंतवाडी,दि.१७ ऑक्टोंबर
बांदा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. या चमकदार कामगिरीमुळे विद्यालयातील सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
​या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या कापडी हिने १५०० मीटर धावणे व लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. प्राची राऊळ हिने गोळाफेकमध्ये प्रथम, तर १०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
​१९ वर्षांखालील मुलांच्या गटात ऋतुराज वराडकर याने भालाफेकमध्ये प्रथम, तर सोहम मडवळ याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
​१४ वर्षांखालील गटात नेहा सुकळवाडकर हिने २०० मीटर धावण्यात प्रथम, सोनाक्षी दळवी हिने ८०० मीटर धावण्यात प्रथम, तर क्रिशांक मुंडये याने २०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावला.
​विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. के. राठोड, पांडुरंग दळवी व लवू जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
​या यशाबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा