Sawantwadi : तिलारी कालव्यांच्या दुरुस्तीचे नवे नियोजन; ३१ डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

शेअर करा

डाव्या कालव्याची दुरुस्ती स्थगित; जानेवारी २०२७ पासून पाणीपुरवठा सुरळीत होणार!

सावंतवाडी,दि.२१ ऑक्टोंबर
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या दुरुस्ती कामांसाठी पाणी पुरवठ्यात बदल करण्यात आला आहे. गोवा सरकारच्या मागणीनुसार तिलारी डाव्या कालव्याची दुरुस्ती स्थगित करण्यात आली असून, त्याऐवजी तिलारी जोड कालवा आणि उजवा तीर कालवा यांच्या दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत दुरुस्ती पूर्ण करून, जानेवारी २०२७ पासून मागणीनुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

शेअर करा