सावंतवाडीच्या नवीन पोलीस निरीक्षकांचे स्वागत; वाहतूक कोंडीबाबत उद्या बुधवारी विशेष बैठक

शेअर करा

सावंतवाडी,दि.४ ऑगस्ट
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदूम यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले आणि नगरसेवकांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान शहरातील वाढत्या ट्रॅफिकच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.
​सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यासाठी उद्या, बुधवारी दुपारी १२ वाजता नगरपालिका सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पोलीस निरीक्षक, ट्रॅफिक पोलीस विभाग, एस. टी. महामंडळ अधिकारी, स्थानिक वाहतूक संघटना, ऑटो रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, मुख्याधिकारी, सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित राहणार असून तात्काळ व दीर्घकालीन उपायांवर चर्चा होणार आहे.
​या वेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, आरोग्य सभापती सुधीर अडीवरेकर आणि पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर उपस्थित होते.

शेअर करा