सावंतवाडी : नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बांदेकर यांचा सत्कार

शेअर करा

औदुंबर स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने गौरव; पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते सन्मान.

सावंतवाडी,दि.२६ जून
सावंतवाडी येथील पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बांदेकर यांचा औदुंबर स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.


नुकतीच त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे याबद्दल
मंदिर समितीच्या वतीने हा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
श्री बांदेकर हे तब्बल गेली 34 वर्षे सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे तर या महीन्याच्या तारखेला ते पोलीस खात्यातील निवृत्त होणार आहेत


या पार्श्वभूमीवर औदुंबर स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्याला शुभेच्छा देण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील पोलीस हवालदार गुरुदास नाईक विलास नर मयूर सावंत आबा पिळणकर निलेश परब उत्सव समितीचे अमोल टेंबकर,हेमंत पांगम,सचिन मोरजकर,भुवन नाईक, आनंद काष्टे, यश गाते अक्षय माशाळ नागेश पाटील शुभम सावंत श्रीरंग सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा