Sawantwadi News: साहित्य प्रेरणा कट्ट्यावर साहित्यातील दुर्गा

शेअर करा

११ महिला सदस्यांकडून आवडत्या प्रथितयश लेखिकांच्या साहित्यिक कार्यावर संवाद

सावंतवाडी,दि.०७ ऑक्टोंबर

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे ‘साहित्यातील दुर्गा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कट्ट्याच्या या सलग मासिक बाहत्तराव्या कार्यक्रमात ११ महिला सदस्य त्यांना भावलेल्या प्रथितयश लेखिकांविषयी बोलतील.

आदरणीय दुर्गाबाई भागवत, इंदिरा संत, अरुणा ढेरे, सुमती क्षेत्रमाडे, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, वीणा गवाणकर, सुनिता देशपांडे, विजया मेहता, माधवी देसाई, सुधा मूर्ती या लेखिकांविषयी अनुक्रमे नम्रता राय, वैभवी रायशिरोडकर, भाग्यश्री मुद्रस, लिना परब, स्नेहा नारींगणेकर, तन्वी ओटवणेकर, अश्विनी पडवळ, प्रियदर्शनी म्हाडगुत, अर्चना लोखंडे, प्राची पालयेकर, सरोज रेडकर या महिला सदस्य बोलतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम कांबळे करतील.

सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी केले आहे.

शेअर करा