सावंतवाडी : हिंदुत्वाची झुल पांघरलेल्या नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना हिंदुत्व शिकवू नये.

शेअर करा

🟣 मुंबई मध्ये रझा अकादमीच्या विरुद्ध राज ठाकरेच रस्त्यावर उतरले होते याचा विसर पडला का?

🟣 राज ठाकरे यांचं हिंदुत्व वाऱ्याची दिशा बघून बदलणार हिंदूत्व नाही.

🟣 ठाकरे बंधूंचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध असताना नितेश राणे यांना पोटशूळ का उठलाय.

🟣 मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांचा सवाल.

सावंतवाडी,दि.०३ ऑक्टोंबर`

अलीकडच्या काळात हिंदुत्वाची झुल पांघरलेल्या व ती झुल घेवून संपूर्ण राज्यात फिरणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदुत्व शिकवू नये कारण ठाकरे हे वाऱ्याची दिशा बघून आपली हिंदुत्वाची भूमिका बदलणारे हिंदुत्व नाही तर ते धगधगत अस हिंदुत्व आहे याचा अनुभव राज्याने अनेक वेळा घेतला आहे. मुंबई मध्ये जेव्हा आपल्या पोलिस भगिनींवर रझा अकादमीच्या गुंडांनी हल्ला केला होता व कपड्यांना हात घातला होता व या मोर्चाने मुंबईमध्ये दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा राज ठाकरे हेच रस्त्यावर उतरले होते व त्याविरुद्ध प्रचंड मोर्चा काढला होता तेव्हा नितेश राणे का शांत होते का हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरले नाहीत याच उत्तर जनतेला देणं आवश्यक आहे.
राहता राहिला विषय मुंबईत उदया सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचा तर उदया आयोजित करण्यात आलेला ठाकरे बंधूंचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध असताना नितेश राणे यांना या मोर्चाला हरकत घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती उलट सत्ताधारी मंडळींच्या अंगात चोरी नसेल तर सत्ताधारी मंडळींनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी केले आहे.

शेअर करा