सावंतवाडी : एनटीसी मिल कामगारांचे बेमुदत लाक्षणिक उपोषण

शेअर करा

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन; कामगारांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर

सावंतवाडी,दि.०७ सप्टेंबर

एनटीसी मिल कामगारांच्या ११ महिन्याच्या ‌थकित पगारासह अन्य मागण्यांचा गुंता केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वकरित्या सोडवावा,अशी मागणी करीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आज मुंबईतील चारही एनटीसी गिरण्यांवर कामगारांचे बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मागील महिन्यात कामगारनेते,विधान परिषदेचे ‌उपसभाप ती‌ सचिन‌‌ अहिर यांनी ‌आपली निवड होताच दोन दिवसाचा दिल्ली दौरा‌केला होता.या दौऱ्यामध्ये उपसभापती ‌सचिन अहिर यांनी‌ खासदारांच्या शिष्टमंडळाद्वारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ‌गिरिराज‌ सिंह,केंद्रीय वणीज्यमंत्री पियुष गोयल‌‌ आदी मंत्रिमहोयांची भेट घेऊन,एनटीसी मिल कामगारांच्या प्रश्ना वर चर्चा केली होती.चर्चा सकारात्मक ‌झाली,त्याची पूर्तता व्हावी ‌यासाठी आज गिरणी कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते.

 गेल्या पाच वर्षापासून बंद असलेल्या मुंबईतील ‌एनटीसीच्या (१)टाटा मिल,दादासाहेब फाळके रोड,(२) इंदू मिल क्रमांक ५, काळाचौकी,(३) पोदार मिल,एन एम जोशी मार्ग आणि (४) दिग्विजय मिल, लालबाग या केंद्रसरकारच्या आखत्यारीतील एनटीसी मिलवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने शांतता मार्गाने उपोषण करून कामगारांनी आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेक र,बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे आदींनी नेतृत्व केले.तर सुरेश मोरे,एम. पी.पाटील,दीप

क राणे,साई निकम,बबन आसवले,गजानन कदम, सखाराम भणगे,हर्षल गुरव आणि अन्य सर्व संघटन सेक्रेटरी,प्रमुख कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.

आम्हाला बसून पगार नको तर हाताला काम हवे! गिरण्या पूर्ववत चालवून कष्टाची भाकर चालू करा,अशा त्यावेळी मागण्या करण्यात आल्या.

१) एनटीसी कामगारांना ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ पर्यंत पगार मिळालेला नाही, तो अविलंब मिळाला पाहिजे.२) सन २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांना अद्याप ग्रॅज्युटी मिळाली नाही,ती मिळाली पाहिजे.३) कामगार आणि कर्मचारी वर्गाला घर भाडे भत्ता, प्रवास भक्ता, वैद्यकीय भत्ता ही कायदेशीर देणी मिळाली पाहिजे,अशा मागण्या कामगारांनी उपोषणांद्वारे केल्या आहेत.
सरकारने एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मकता नाही दाखवली तर कामगार रस्त्यावर उतरतील,असा इशारा राष्ट्रीय मिल मजूदर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी टाटा मिल कामगारांच्या आंदोलनात बोलतांना दिला आहे…KNM •••••

शेअर करा