सावंतवाडी :ओटवणे-चराठे वीज ग्राहकांचा सावंतवाडी महावितरण कार्यालयावर धडक महिनाभराच्या वीज लपंडावामुळे ग्रामस्थ आक्रमक

शेअर करा

सावंतवाडी, दि. ०७ जुलै

चराठे पंचायत समिती कार्यक्षेत्रातील ओटवणे व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या कारभाराचा निषेध करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.महत्वाचे अधिकारी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे ऑफिस मध्ये नव्हते 

गेल्या महिनाभरापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच लघुउद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनादरम्यान महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तातडीने नियमित वीज पुरवठा सुरू करावा, बिघाडांचे कायमस्वरूपी निराकरण करावे आणि नागरिकांना होणारा मनस्ताप थांबवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने महावितरण कार्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, लवकरात लवकर ठोस कार्यवाही होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलनावर ठाम राहण्याचे सांगितले.
यावेळी क्लेटस फर्नाडिस, शब्बीर मणियार, गुंडू जाधव, चराठे सरपंच प्रचिती कुबल, रवींद्र म्हापसेकर या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा