सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा ९ वर्षांनंतर; उद्याच्या सभेकडे तालुक्याचे लक्ष

शेअर करा

सावंतवाडी दि.१३ ऑगस्ट
सावंतवाडी तालुका पंचायत समितीची आमसभा उद्या शुक्रवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तब्बल ९ वर्षांनंतर ही आमसभा होत असल्याने खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा