​सावंतवाडी: नेमळे ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

शेअर करा

​सावंतवाडी दि.९ ऑगस्ट
जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन ज्युनियर ॲथलेटिक्स मीटमध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या कामगिरीच्या जोरावर तीन खेळाडूंची डेरवण (रत्नागिरी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
​या स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दाजी कापडी हिने १००० मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. प्राची दत्ताराम राऊळ हिने गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात ऋतुराज राजन वराडकर याने भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर सोहम राजन मडवळ याने भालाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
​या यशस्वी खेळाडूंना पांडुरंग दळवी सर यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच पालक दाजी कापडी व राजन मडवळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
​खेळाडूंच्या या यशॉबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा