सावरवाड–कुडतरकर टेंब येथे कारवाईत दोन हजार रुपयांचा दारूचा मुद्देमाल जप्त; ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिसांची धडक मोहीम
सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट
सांगेली सावरवाड कुडतरकर टेंब येथे बेकायदा गोवाबनावटीच्या दारूचा मुद्देमाल बाळगल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कारवाई करत महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन हजार रुपये किमतीचा बेकायदा दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सांगेली सावरवाड भागात बेकायदा अवैध दारू विक्री सुरू आहे. सांगेली ग्रामस्थांनी एकजूट होत तिथे सुरू असलेले दारूचे अड्डे बंद करावेत अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलीस दिपक शिंदे यांनी धडक कारवाई करत घरात चोरटी दारू विक्री सुरू असताना धाड टाकली. यात बेकायदा दारूचा मुद्देमाल आढळून आला आहे. याप्रकंरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस दीपक शिंदे करत आहेत.