अकरा जणांवर गुन्हा दाखल; क्लबचा प्रमुख राजकुमार कवठणकर पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी,दि.१० सप्टेंबर
दांडेली-धनगरवाडी येथे बंद घरात गेले कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या रमी जुगार वजा क्लब वर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकत धाडसी कारवाई केली. या कारवाईत ४५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ९ अँड्रॉइड मोबाईल, ८ दुचाकी, कुलर, वॉटर प्युरिफायर, जुगाराचे साहित्य मिळुन एकूण सहा लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकुण अकरा जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या क्लबचा प्रमुख म्होरक्या राजकुमार दिनकर कवठणकर याला ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तो कित्येक महिन्यांपासून दांडेली-धनगरवाडी येथे रमी जुगार क्लब चालवत होता. ही कारवाई गुरुवारी रात्री दीड वा.पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांच्या पथकाने केली. यातील सर्व संशयितांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
दांडेली धनगरवाडी येथे एका बंद घरात संशयित राजकुमार कवठणकर क्लब च्या नावाखाली अवैध रमी जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. गेली कित्येक महिन्यांपासून याच घरात रमी जुगार खेळवला जात असून
बुधवारी देखील जुगार सुरू असताना सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, यांनी सातार्दा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस व पोलिसांच्या टिमच्या मदतीने सापळा रचून मध्यरात्री दीड वा क्लबवर अचानक धाड टाकली. यामुळे सर्वच गोंधळून गेले. या कारवाईत ४५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ९ अँड्रॉइड मोबाईल फोन, ८ दुचाकी, जुगार साहित्य, तीन लोखंडी टेबल, एक व्होल्टास कंपनीचा वॉटर प्युरिफायर, एक कुलर, चार प्लास्टिक टी पॉय, तीन बॉक्स तीन पत्ती कॅट, ३४ जुने तीन पत्ती कॅट असलेले बॉक्स, २६ प्लास्टिक फायबर खुर्च्या, कॉइन असलेले तीन बॉकस,जुगार रजिस्टर साहित्य असे मिळून एकूण सहा लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाजुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये संशयित श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर रा दांडेली, राजकुमार दिनकर कवठणकर रा कवठणी, गणेश शांताराम सोपटे किनाळे वरचीवाडी, सुधीर सोमनाथ राऊळ रा कुडाळ तेंडोली, नंदकिशोर मनोहर नाईक किनळे भटवाडी, अनंत भास्कर सारंग सावंतवाडी, निरंजन आनंद नाईक आरोस गिरोबावाडी, आनंद सोहम केरकर मळेवाड परबवाडी, गजानन महादेव वाडकर सबनिसवाडा सावंतवाडी, श्रीधर प्रकाश पालव तळवणे पालवाडी, मिलन शांताराम खवणेकर ४४ शिरोडा वरचीकेरवाडी या एकूण ११ जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हा क्लब घर क्रमांक ५०१ मध्ये सुरू होता तर हे घर संशयीत श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर (वय ४५, दांडेली) याच्या मालकीचे असून या ठिकाणी राजकुमार दिनकर कवठणकर हा क्लब चालवित होता अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
पोलिसांच्या धडक कारवाईमुळे या परिसरातील अवैध जुगार धंदे वाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अवैध धांद्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी भेट देत पाहणी केली.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात पोलीस कॉ राहुल बर्गे यांनी फिर्याद दिली त्यावरून संशयितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस राजेश टक्केकर, पोलीस राहुल बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार हाती घेताच सावंतवाडी तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. अवैध बंदुक प्रकरणी त्यांनी अकरा जणांवर कारवाई केली कर्नाटक महाराष्ट्र मधून संशयित यांना ताब्यात घेतले. दारू वाहतूक, काळ्या काचा आणि जुगार वर देखील त्यांच्याकडून कारवाई सुरूच आहे. यातील सर्व संशयितांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.