सावंतवाडी : प्रवीण पालव यांचे शैक्षणिक कार्य

शेअर करा

सावंतवाडी,दि.१४ जुलै

आजगाव वसवाचे तळे शाळेतील विद्यार्थ्यांना अंगभूत कलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना धाकोरे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखा प्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवीण पालव यांनी चित्रकला विषयाला अनुसरून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
पालव हे नेहमीच सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात समाजपयोगी कार्य करून मदत करत असतात तसेच ते विविध स्पर्धा,सामाजिक कार्यक्रम आयोजित करून गावातील,मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात.त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर तसेच ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती पालव,दामिनी परब, पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा