Sawantwadi : प्राचार्य डॉ. यशोधन गवस यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान!

शेअर करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन व्यवसाय व्यवस्थापनावर केलेल्या संशोधनाची दखल.


​सावंतवाडी,दि.२५ ऑक्टोंबर

लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशोधन गवस यांना मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाकडून (ग्रामीण विकास) ‘विद्यावाचस्पती’ (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
​त्यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासास अनुरूप रोजगार निर्मितीविषयक व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास” (Study of Tourism Business Management For Employment Generation Consentaneous to Rural Development Of Sindhudurg District) या विषयावर आपला महत्त्वपूर्ण शोधनिबंध सादर केला होता.


​या संशोधनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शक (गाईड) म्हणून मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, या विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांचेही विशेष सहकार्य मिळाले.
​त्यांच्या या यशात डॉ. सचिन राऊत, डॉ. किरण पाटील, डॉ. शुभम सोनावणे, हळबे महाविद्यालय दोडामार्गचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत आणि डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचे मोलाचे योगदान राहिले. डॉ. गवस यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचेही आभार व्यक्त केले आहेत.
​विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
​डॉ. यशोधन गवस यांच्या या उत्तुंग यशाबद्दल लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर आणि सचिव श्री. पंढरी परब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यासोबतच, लोकमान्य ट्रस्टचे सर्व संचालक, समन्वयक डॉ. मिसाळे, सीनियर एक्झिक्यूटिव्ह श्री. प्रवीण प्रभू केळुसकर तसेच गवाणकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
​तसेच त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता गवस, वडील मोहन गवस, नातेवाईक आणि मित्र परिवाराने डॉ. गवस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
​स्व. आईला पदवी समर्पित
​डॉ. यशोधन गवस यांनी आपली ही विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी आपल्या स्वर्गीय आई कै. अरुंधती गवस (निवृत्त शिक्षिका) यांना अत्यंत भावूक होऊन समर्पित केली आहे.

शेअर करा