सावंतवाडीत ‘नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी

शेअर करा

​सावंतवाडी, दि. ६ जुलै


पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ उद्या, मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. जिमखाना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील बॅडमिंटन हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
​जिमखाना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ४ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आणि चित्रकला या विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा आता यशस्वीरित्या संपन्न झाल्या आहेत.
​स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा आणि खेळाडूंचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. तरी या बक्षीस वितरण समारंभाला सर्व विजेत्या स्पर्धकांनी, खेळाडूंनी आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धा लखम सावंत भोसले यांनी केले आहे.

शेअर करा