सावंतवाडी,दि.२९ जून
आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल चे माजी विद्यार्थी तथा प्रा . डॉ.प्रमोद नाईक यांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत “ऋणात तुझिया”, “एक एक पाऊल उचली” “असामान्य व्यक्तिमत्वे” यांसारखी प्रेरणादायी पुस्तके विद्या विहार प्रशालेतील विद्यार्थ्यांना भेट दिलीत.त्यांच्या या मोलाच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढेल, तसेच त्यांना जीवनात सकारात्मक दिशा आणि प्रेरणा मिळणार असून प्रा. डॉ.प्रमोद नाईक यांच्या उदात्त कार्याबद्दल विद्या विहार इंग्लिश स्कूल,मुख्याध्यापक उत्तम भागीत तसेच शिक्षक वर्ग यांनी आभार मानले .व कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ प्रमोद नाईक हे विविध सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून,त्यांच्या या सहकार्याबद्दल पालक ,विद्यार्थ्यांनी,ग्रामस्थानी आभार व्यक्त केले.