सावंतवाडी : दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना राजेंद्र नाईक यांच्याकडून शैक्षणिक साहित्य

शेअर करा

सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट

किनळे गावचे व्यावसायिक तथा उद्योजक राजेंद्र नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमात दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर यांनी प्रास्ताविकातून राजेंद्र नाईक यांचा परिचय करून देत छात्रालयाच्या कार्याची व उपक्रमांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी बोलताना राजेंद्र नाईक यांनी दयासागर छात्रालयातील कार्यपद्धती व विद्यार्थ्यांची जिद्द तसेच व्यवस्थापनाबाबत कौतुक केले. भविष्यातही या छात्रालयाला आपल्या परीने सहकार्य करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा शैक्षणिक संस्थांना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी व्यवस्थापक जिवबा वीर यांनी राजेंद्र नाईक तसेच त्यांचे सहकारी मदन मुरकर यांचे छात्रालयाच्या वतीने आभार मानले.

शेअर करा