सावंतवाडी,दि.१५ जुलै
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सावंतवाडी अंतर्गत तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त असलेल्या मानधनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक महिला उमेदवारांनी आपले अर्ज दि. २० जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सावंतवाडी येथे सादर करायचे आहेत.
या भरती प्रक्रियेत मदतनीस पदासाठी दरमहा ७,५०० रुपये आणि सेविका पदासाठी १३,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. संबंधित ग्रामपंचायत व महसूल गावातील पात्र महिलांनी यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
अंगणवाडी मदतनीस पदासाठी डिंगणे (डिंगणे धनगरवाडी), किनळे (किनळे वरचीवाडी),निरवडे (निरवडे बाईतवाडी),
कारीवडे (कारीवडे आपटयाचे गाळू),
कोलगाव (कोलगाव चव्हाटा),कोलगाव (कोलगाव शाळा नं. १), ओटवणे (ओटवणे शाळा नं. २), ओटवणे (ओटवणे शाळा नं. ३),ओटवणे (ओटवणे शेरवाळेवाडी),
बांदा (बांदा मोर्येवाडी),बांदा (बांदा सटमट) या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत.
अंगणवाडी सेविका पदासाठी डेगवे (डेगवे मोयझर), पडवे माजगाव (पडवे माजगाव),
आरोंदा (आरोंदा सावरजुवा), सावरवाड (सावरवाड परबटेंब) या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, प्रकल्प कार्यालय सावंतवाडी येथे संपर्क साधण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.