कोकणकन्या एक्सप्रेसचा वेर्णा स्थानकातील तांत्रिक थांबा पूर्ववत
सावंतवाडी,दि.१५ ऑक्टोंबर
गोव्यातील वेर्णा इंडस्ट्रियल एरियामध्ये कामानिमित्त राहणाऱ्या सिंधुदुर्गातील तरूण व चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोकणकन्या एक्सप्रेसचा वेर्णा रेल्वे स्थानकातील तांत्रिक थांबा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गातून सकाळी कामानिमित्त वेर्णा इंडस्ट्रियल एरियामध्ये येणाऱ्या आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्या कामगारांची मोठी सोय झाली आहे. प्रवाशांना आता ‘यूटीएस’ (UTS) अॅप किंवा बुकिंग काउंटरद्वारे मडगावचे तिकीट काढून वेर्णा स्थानकातून सोयीस्कररीत्या प्रवास करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून हा थांबा बंद किंवा अनियमित असल्यामुळे नोकरदार वर्गाची आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आता हा तांत्रिक थांबा पूर्ववत सुरू झाल्यामुळे वेर्णा येथे काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील शेकडो तरुणांचा प्रवास सुकर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.