सावंतवाडी : गोपूरी , वागदे येथे निवासी युवा शिबिराचे आयोजन

शेअर करा

सावंतवाडी दि.8 सप्टेंबर
त्रिरत्न बौध्द महासंघ, सिंधुदुर्ग व गोपूरी आश्रम वागदे यांच्या संयुक्त विद्यमाने गोपूरी आश्रम वागदे येथे 14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत चार दिवसीय निवासी युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील धम्मचारी अनोमदस्सी व सहाय्यक मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील धम्मचारिणी बोधिमोदिनी आणि शाक्यवज्री हे असणार आहेत.
या शिबिराची सुरुवात पालक – पाल्य मेळाव्याने होत असून पालकांनी मुलांशी आदर्श संवाद कसा साधावा यावर चर्चासत्र होणार आहे, तसेच युवा शिबिरातून ‘धम्मक्रांती आणि तरुण’ यावर विषयावर युवकांशी संवाद साधला जाणार आहे. विशेषतः यामध्ये योगा ध्यानसाधना, गटचर्चा, अभ्यास या माध्यमातून शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या पालक-पाल्य मेळाव्यासाठी व युवा शिबिरासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य युवक – युवतींनी आणि पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्रिरत्न बौध्द महासंघाचे धम्मचारी अमृतसागर यांनी केले आहे.

शेअर करा