सावंतवाडी : साहित्य कट्ट्यातर्फे शिरोडा येथे पुस्तकचर्चेचे आयोजन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२४ सप्टेंबर


आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे ‘पुस्तकाविषयी बोलू काही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कट्ट्याच्या या सलग एकाहत्तराव्या मासिक कार्यक्रमात आठ वाचक त्यांना भावलेल्या पुस्तकाविषयी बोलतील.

सकल संत चरित्र गाथेवर डाॅ.श्रीराम दीक्षित, शेती नवीन चष्म्यातून या पुस्तकावर विनय सौदागर, एक होता कार्व्हर विषयी नम्रता राय, ढगा आडचे चांदणे पुस्तकाविषयी सरोज रेडकर, बिजापूर डायरी पुस्तकावर नीलम कांबळे, प्रत्यक्ष स्वर्गाचा शोध पुस्तकाविषयी कमलेश अणावकर, भोवताल काव्यसंग्रहाविषयी स्नेहा नारिंगणेकर आणि पथेर पांचाली या अनुवादित पुस्तकाविषयी अरुण धर्णे विवेचन करतील.

शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी केले आहे.

शेअर करा