सावंतवाडी : सफाई कर्मचारी धोंडू बरागडे यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ

शेअर करा

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्यासह सभापती व नगरसेवकांची कुटुंबीयांना भेट; दुःखद प्रसंगी व्यक्त केले सांत्वन

सावंतवाडी,दि.१३ ऑगस्ट :

नगर पालिकेतील सफाई कर्मचारी धोंडू गंगाराम बरागडे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने नगर पालिका प्रशासनासह संपूर्ण शहरात आणि सफाई कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​या दुःखाच्या प्रसंगी नगराध्यक्षा सौ श्रद्धा लखम सावंत भोसले, सभापती आणि नगरसेवक यांनी दिवंगत धोंडू गंगाराम बरागडे यांच्या निवासस्थानी संयुक्तपणे भेट देऊन शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले.
​नगर पालिकेने एक प्रामाणिक सेवक गमावला
​भेट प्रसंगी कुटुंबाशी संवाद साधताना नगराध्यक्षा म्हणाल्या, धोंडू बरागडे यांनी नगर पालिकेत अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या अचानक जाण्याने नगर पालिका परिवाराने कष्टकरी सेवक गमावला आहे.
​या कठीण प्रसंगात नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे बरागडे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा धीर उपस्थित नगरसेवकांनी दिला.
स्व. धोंडू गंगाराम बरागडे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून मिळणारे सर्व शासकीय लाभ आणि आवश्यक ती सर्व मदत लवकरात लवकर मिळवून दिली जाईल, असे आश्वासनही यावेळी नगराध्यक्षा नी दिले
​या प्रसंगी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर अडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, सुकन्या टोपले, सिद्धार्थ भांबुरे आदी नगरसेवक उपस्थित होते सर्वांनीच स्व. धोंडू बरागडे यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

शेअर करा