सावंतवाडी : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत सावंतवाडी शाळा क्रमांक २ ची दैदिप्यमान कामगिरी

शेअर करा

जिल्हा गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थ्यांचे स्थान; आराध्य आपटे राज्यात ९ वा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

सावंतवाडी, ,दि.०३ जुलै
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत येथील कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (सावंतवाडी शाळा नंबर २) या शाळेने दैदिप्यमान यश संपादन करत जिल्ह्यात आपला डंका वाजवला आहे. या परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये शाळेचा विद्यार्थी आराध्य अमोल आपटे याने राज्यात ९ वा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशाचा आलेख उंचावला आहे.


​शाळेतील इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पूर्वांग कुणाल माळगावकर (जिल्ह्यात ५ वा), सई शिवाजी आरेकर (जिल्ह्यात ७ वी), सुरेश मंगेश वरक (जिल्ह्यात ८ वा), नील पांडुरंग थोरात (जिल्ह्यात १४ वा), श्रीशा मिहिर प्रभुदेसाई (जिल्ह्यात १६ वी), स्वामिनी अजित कोळी (जिल्ह्यात १९ वी), साहिल शाहू खरात (जिल्ह्यात २० वा), दुर्वा अजित सावंत (जिल्ह्यात २५ वी), श्रीकर मंदार शुक्ल (जिल्ह्यात २७ वा), मैत्रेय राजाराम दळवी (जिल्ह्यात ३६ वा), मीरा मकरंद देसाई (जिल्ह्यात ३९ वी), नील प्रशांत नार्वेकर (जिल्ह्यात ४२ वा) आणि सानवी चेतन देसाई (जिल्ह्यात ५३ वी) या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी केली आहे.


​एकाच शाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा