सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय मंडळाची स्थापना; अध्यक्षपदी सिताराम सावंत,४० वर्षांच्या परंपरेला मिळाले संस्थात्मक स्वरूप

शेअर करा

​सावंतवाडी ,दि.१३ ऑगस्ट
गेल्या ४० वर्षांपासून वारकरी संप्रदायात हरिपाठ, प्रवचन, पारायण आणि पायी वारीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील वारकऱ्यांनी एकत्रित येत ‘सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय मंडळ’ या संस्थेचे अधिकृत रजिस्ट्रेशन केले आहे.
​गेल्या चार दशकांपासून या तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरची पायी वारी करत असून गावागावांत पारायण, हरिपाठ आणि प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन व भक्तीचा प्रसार करत आहेत. याच कार्यास अधिक संघटित स्वरूप देण्यासाठी आणि समाजात भक्तिमार्गाची जनजागृती करण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.


​या नव्याने नोंदणीकृत संस्थेच्या ११ सदस्यीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून ​संस्थापक अध्यक्ष: ह. भ. प. सिताराम सावंत,
​उपाध्यक्ष: ह. भ. प. विलास राणे,
​कार्याध्यक्ष: ह. भ. प. श्यामसुंदर कुंभार,
​सचिव: ह. भ. प. प्रकाश केळुसकर,
​खजिनदार: ह. भ. प. उदय सावंत,
​सदस्य:
ह. भ. प. लक्ष्मण कडव, ह. भ. प. आपा सावंत, ह. भ. प. दशरथ नाईक, ह. भ. प. राजेंद्र सावरवाडकर, ह. भ. प. गजानन राऊळ, ह. भ. प. सोमा गावडे. तर
​सल्लागार मंडळ:
ह. भ. प. बाळकृष्ण परब, ह. भ. प. शिवराम सावंत, ह. भ. प. मधुकर कडव, ह. भ. प. प्रकाश पास्ते आदींचा समावेश आहे.
या संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. सिताराम सावंत म्हणाले,​”केवळ सावंतवाडी तालुक्यातच नव्हे, तर जिथे गरज असेल तिथे जाऊन आमचे पदाधिकारी पारायण, हरिपाठ व प्रवचनांच्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्गाकडे वळवण्याचे आणि आध्यात्मिक जनजागृतीचे कार्य करतील.” असा विश्वास व्यक्त केला.

शेअर करा