सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे कळसुलकर हायस्कूल मधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा, भेट वस्तू, सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
गेली वीस वर्षे ज्ञानदीप मंडळ जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करुन प्रोत्साहन, कौतुकाची थाप देऊन प्रेरणादायी कार्य करीत असते.या सन्मान समारंभाचे अध्यक्ष वाय पी नाईक उपस्थित होते.
कळसुलकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले
यावेळी चौथीत शासकीय शिष्यवृत्ती धारक,कु.चैतन्य प्र सावंत,धारा म.कोरगावकर,वेद गो.गवस, तसेच सातवी शिष्यवृत्ती धारक वेदांत सु.देशमुख, जिज्ञासा म देसाई, अवनी रा बावकर,सानवी र.सावंत, चैतन्या कृ.पास्ते, दुर्वा अ.केसरकर यांना ज्ञानदीप तर्फे सन्मानित करण्यात आले
यावेळी मुख्याध्यापक एस व्ही भुरे, जावेद शेख, सुनील नेवगी, वैभव केंकरे,एस आर मांगले, सिद्धेश कुळकर्णी,पी.बी बागुल, अनिल ठाकुर, ज्योत्स्ना गुंजाळ,प्राची बिले,स्वरा राऊळ अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत प्रदीप सावंत यांनी केले आभार धोंडी वरक यांनी मानले