Sawantwadi : सावंतवाडीत शालेय बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

शेअर करा

एस. सी. स्पोर्ट्स अकॅडमी, मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि स्वास्थ्य संकल्प समिती फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; जिल्हास्तरीय स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य संधी.

​सावंतवाडी,दि.१२ ऑक्टोबर
एस. सी. स्पोर्ट्स अकॅडमी, मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि स्वास्थ्य संकल्प समिती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
​युवराज लखमराजे भोसले यांच्या संकल्पनेतून श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. आगामी जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६० हून अधिक शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
​सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू (नोंदवही) प्रदान करण्यात आली. तसेच विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
​स्पर्धेचा निकाल
​१४ वर्षांखालील मुली (एकेरी):
​विजेती: स्वरा राऊळ
​उपविजेती: अस्मि कविटकर
​१४ वर्षांखालील मुले (एकेरी):
​विजेता: आदित्य पिळगावकर
​उपविजेता: ग्लेन डिसिल्व्हा (Glen Dsilva)
​१७ वर्षांखालील मुले (एकेरी):
​विजेता: हर्षद धारगळकर
​उपविजेता: मोहित सारंग
​१७ वर्षांखालील मुली (एकेरी):
​विजेती: राधिका सोनाळकर
​उपविजेती: गौरवी बोडेकर
​१७ वर्षांखालील दुहेरी (गट):
​विजेते: ग्लेन डिसिल्व्हा आणि अनय नाटेकर
​उपविजेते: आदित्य पिळगावकर आणि रक्षण सावंत आदीचा समावेश आहे.

शेअर करा