सावंतवाडी,दि.२३ ऑगस्ट
होडावडे कवडासवाडी ( ता. वेंगुर्ले) येथील अत्यंत प्रेमळ व ज्येष्ठ नागरिक कै. सुलोचना वासुदेव दळवी (वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या ९० वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी अत्यंत कष्टाने आणि प्रेमाने कुटुंबाची घडी बसवली. त्यांच्या साध्या, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे गावात व परिसरात त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. त्यांच्या जाण्याने दळवी कुटुंबातील एक मजबूत आधारवड हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे बाळा, लक्ष्मण , महेश, दोन मुली,सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आणि विस्तारित परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या वेळी परिसरातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.