सावंतवाडी ,दि.२२ जुलै
आधार कार्ड हाच वय अधिवासाचा पुरावा असतानाही एसटी महामंडळाने नव्याने एसटी सर्व सवलतीसाठी स्मार्ट कार्ड सुविधा एक ऑगस्ट पासून अनिवार्य केल्याने व ही सुविधा सावंतवाडीत सध्या उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना यासाठी भर पावसात यातायात करावी लागत आहे.. यासंदर्भातील वृत्त असे की एसटी महामंडळाच्या ज्येष्ठ नागरिक व अन्य सुविधासाठी आधार कार्ड ग्राह्य मानले जात होते मात्र आता नव्याने या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे ही सुविधा केवळ आणि केवळ संबंधित कंत्राट दाराकडेच उपलब्ध आहे. सावंतवाडी येथील कंत्राटदाराने वीस रुपये जादा दराने दर आकारल्यानंतर काही लोकांनी तक्रारी केल्या त्यानुसार सदर स्मार्ट कार्ड तयार करणाऱ्याने आपले कार्यालय बंद केल्यानंतर ही अशी पाळी निर्माण झाली आहे. कार्यालय बंद केल्याने ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. शासनाने या स्मार्ट साठी रुपये फी जाहीर केले होते मात्र ज्यांच्याकडून कागदपत्र भरून पैसे घेऊन स्मार्ट कार्ड न दिल्याने ते मिळवण्यासाठी कार्यालयात येऊनही कार्यालयाचे दरवाजा बंद असल्याने व एसटी डेपोकडे कोणत्याही प्रकारचीअधिकृत माहिती नसल्याने संबंधित जेष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी आणि त्यानंतर ते मिळवण्यासाठी यातायात करावी लागत आहे. अशाच ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी या कार्यालयासमोर रांगा लावल्यानंतर दोन अडीच तास होऊनही नसल्याने पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव यांनी डेपोव्यवस्थापकांची भेट घेतली असता त्यांनी आपल्या कानावर हात ठेवले आणि संबंधित मुलीचा फोन वॉचमन कडून घ्या आणि फोन करून संपर्क साधा असे सूचना केली तर हात ठेवले. आता जायचं कुणाकडे अशी शंका या ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत असल्याने शासनाने या स्मार्ट कार्ड बाबत योग्य ती दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.