सावंतवाडी : कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीवर ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची फेरनिवड

शेअर करा

सावंतवाडी ,दि.०७ सप्टेंबर

महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीवर ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागीय समितीची मुदत जुलै अखेर संपली होती.
शासनाने नव्याने शासन आदेश काढून राज्यातील सर्व समित्यांच्या निवडीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
कोल्हापूर ,पुणे, नागपूर, कोकण, लातूर ,औरंगाबाद आधी सर्व विभागीय समित्याना मुदत देण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागीय समितीमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश असून या समितीचे अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. समीर देशपांडे त्यांची नियुक्ती झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी शासनाची अधिस्विकृती मिळवण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावे असे आवाहन श्री गजानन नाईक यांनी केले आहे.

शेअर करा