सावंतवाडी – योग शिबिराचे उद्घाटन करताना शेखर बांदेकर बाजूला डॉ सागर जाधव सौ साधना गुरव सुनील सोन्सुरकर आदी

शेअर करा

सावंतवाडी,दि.२२ सप्टेंबर
सेवा संकल्प अभियान अंतर्गत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फिटनेस योग फाउंडेशनचे शेखर बांदेकर यांनी या शिबिरात बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विशाल रेड्डी, आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव, जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागाच्या योग शिक्षिका सौ साधना गुरव, फिटनेस योग फाउंडेशनचे शिक्षक शेखर बांदेकर, सुनील सोन्सुरकर आदी उपस्थित होते.

यावेळी योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी उपस्थितांना योग प्राणायाम, ध्यान, सूर्य नमस्कार या योग प्रकाराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शेखर बांदेकर यांनी सुखी आणि स्वस्थ जीवनासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठणे, योग्य निद्रा, योग्य आणि शाकाहारी आहार ही तीन सूत्र सांगितली. तसेच प्राणायाम, अनुलोम, विलोम कपालभातीसह सूर्य नमस्काराचे १२ प्रकार प्रात्यक्षिकासहित दाखवले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सोन्सुरकर यांनी तर उपस्थितांचे स्वागत डॉ सागर जाधव यांनी केले.

शेअर करा