सावंतवाडीत कायदा-सुव्यवस्था व आंबोली वाहतूक व्यवस्थेबाबत शिंदे शिवसेनेची पोलिसांशी चर्चा

शेअर करा

सावंतवाडी ,दि.०७ ऑगस्ट

सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेश भागवत व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे दोन्ही प्रमुख अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली व सावंतवाडी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था व आंबोली घाटातील वाहतूक व्यवस्था या संदर्भात चर्चा केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत यांनी निश्चितपणे यासंदर्भात दखल घेतली जाईल असे स्पष्ट केले पोलीस निरीक्षक श्री मगदूम यांनी पोलीस कुमक ची आवश्यकता आहे त्या संदर्भात आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले यावेळी तालुका प्रमुख नारायण राणे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गजानन नाटेकर पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे संजय पालकर विश्वास घा ग एकनाथ हळदणकर आदी उपस्थित होते यावेळी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा व श्री राणे यांनी वाहतूक व्यवस्थे संदर्भात चर्चा केली

शेअर करा