सावंतवाडी,दि.२९ जून
सावंतवाडी तालुका शिवसेना आयोजित आणि आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मंगळवार दि.३० जून रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्धीन हॉल, एस टी स्टँड समोर येथे आयोजित केला आहे.तरी आपण सर्वांनी या सन्मान सोहळ्याला उपस्थित रहावे.असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांनी केले आहे.