सावंतवाडी,दि.२३ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ( इस्कॉन) सावंतवाडी आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव थाटात साजरा होणार आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहस्रनाम प्रभुजी (इस्कॉन) पंढरपूर हे यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला संबोधित करणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने भजन कीर्तन अभिषेक प्रवचन नाटिका आणि स्वादिष्ट कृष्णप्रसाद अशा भरगच्च परिपूर्ण कार्यक्रमाचा दिव्यानंद लुटण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून ज्या भाविकांना दूध दही अन्नधान्य फुले फळे इत्यादी वस्तू कृष्ण सेवेसाठी दान द्यायचे असल्यास मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भडवाडी हरेकृष्ण संस्कार केंद्रावर साप्ताहिक सत्संग प्रत्येक रविवारी सकाळी ११ वाजता होत असतो या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उदय प्रिय प्रभुजी, प्रकाश रेडकर, वसु श्रेष्ठदास, देवकी पुत्र प्रभुजी, राजेश वाडकर आदींनी केले आहे.